
2021-03-07T13:46:48
https://youtu.be/h3aNyExtAGs करोना लस घेण्यासाठी www.cowin.gov.in या पोर्टल वर नोंदणी व पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) कशी निश्चित करायची या साठी वरील विडिओ पहा. नोंदणी (रेजिस्ट्रेशन) झाल्या नंतर अपॉइंटमेंट घेताना शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, फुरसुंगी, पुणे येथे लस घेण्यासाठी, Block Haveli किंवा Pin Code 412308 एंटर करावा. या नंतर खाली लसीकरण केंद्रांची यादी येईल. या मध्ये SHIVAM MULTYSPECIALITY HOSPITAL, Taravdi, Fursungi, Pune हे केंद्र सिलेक्ट करावे. आपल्याला लस उपलब्धते नुसार तारखा दिसतील. या मध्ये प्रत्येक तारखेला दोन सत्रात लस घेता येईल. Forenoon: स ९ ते १ Afternoon: दु २ ते ५ आपल्याला हवी असलेल्या तारखे समोरील योग्य वेळेच्या पर्यायावर क्लिक करा. खाली स्क्रोल करून Book Appointment वरती क्लीक करा. अपॉइंटमेंट ची पावती येईल, डाउनलोड करा. तुम्ही याची प्रिंट किंवा मोबाईल स्क्रीन शॉट घेऊ शकता. दिलेल्या तारीख आणि वेळे मध्ये शिवम हॉस्पिटल, काळभोर लॉन्स समोर, पुणे सोलापूर रोड, तरवडी, फुरसुंगी, पुणे 412308 येथे आपला मोबाइल व ओळखपत्र (जे रेजिस्ट्रेशन ला वापरले ते) घेऊन या. ज्यांचे व ४५ ते ६० आहे त्यांनी Comorbidities (डायबेटीस, बी पी, हृदय विकार, किडनी विकार इत्यादी) असल्याचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन येणे. येथे आपले वेरिफिकेशन करून २५० रु प्रति व्यक्ती प्रति डोस भरावे लागतील. या नंतर लस दिली जाईल व आपल्याला ३० मिनिटे थांबण्यास सांगितले जाईल. काही त्रास झाल्यास उपचार केला जाईल. (९९ % लोकांना काही त्रास होत नाही) ३० मिनिटा नंतर आपल्याला लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. आता आपण सुरक्षितपणे घरी जाऊ शकता. दुसरा डोस, घरी घेण्याच्या गोळ्या व सूचना लेखी दिल्या जातील. कृपया त्याचे पालन करावे. अधिक माहिती साठी संपर्क. 7028062780 9370108108 संकेतस्थळ www.shivamhospitalpune.in