
2021-03-10T06:05:26
https://youtu.be/h3aNyExtAGs *करोना लस घेण्यासाठी* www.cowin.gov.in या पोर्टल वर नोंदणी व पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) कशी निश्चित करायची या साठी वरील विडिओ पहा. नोंदणी (रेजिस्ट्रेशन) झाल्या नंतर अपॉइंटमेंट घेताना *शिवम मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल*, फुरसुंगी, पुणे येथे लस घेण्यासाठी, *Pin Code 412308* एंटर करावा. या नंतर खाली लसीकरण केंद्रांची यादी येईल. या मध्ये *SHIVAM MULTYSPECIALITY HOSPITAL*, Taravdi, Fursungi, Pune हे केंद्र सिलेक्ट करावे. *आपल्याला लस उपलब्धते नुसार तारखा दिसतील.* या मध्ये प्रत्येक तारखेला दोन सत्रात लस घेता येईल. *Forenoon: स १० ते १* *Afternoon: दु २ ते ५* आपल्याला हवी असलेल्या तारखे समोरील योग्य वेळेच्या पर्यायावर क्लिक करा. खाली स्क्रोल करून Book वरती क्लीक करा. आपल्याला मोबाईल वर NHPSMS वरून अपॉइंटमेंट चा SMS येईल तो आपण हॉस्पिटलच्या 9370108108 या क्रमांकावर पाठवावा. आपल्याला हॉस्पिटल मधून फोन येईल. २ तासात फोन न आल्यास 9370108108 या क्रमांकावर (दु १२ ते रा ८ या वेळेत) फोन करावा. हॉस्पिटल मधून आमचे प्रतिनिधी आपली माहिती घेऊन आपल्या सोयीनुसार वेळ पूर्वनियोजित करतील. हॉस्पिटल कडून (SMAACC) वरून SMS आपल्याला मोबाईल वरती येईल या मध्ये आपली येण्याची वेळ असेल. कृपया दिलेल्या तारखेला सुनिश्चित केलेल्या वेळीच हॉस्पिटल ला लसीकरणासाठी या. यामुळे गर्दी होणार नाही व आपल्याला थांबावे लागणार नाही. दिलेल्या तारीख आणि वेळे मध्ये शिवम हॉस्पिटल, काळभोर लॉन्स समोर, पुणे सोलापूर रोड, तरवडी, फुरसुंगी, पुणे 412308 येथे आपला मोबाइल व ओळखपत्र (जे रेजिस्ट्रेशन ला वापरले ते) घेऊन या. ज्यांचे व ४५ ते ६० आहे त्यांनी Comorbidities (डायबेटीस, बी पी, हृदय विकार, किडनी विकार इत्यादी) असल्याचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन येणे. (सर्टिफिकेट चा नमुना सोबत जोडला आहे) हॉस्पिटल ला आल्यावर थेट काउंटर २ वेरिफिकेशन (Verification) येथे SMS दाखवावा. पुढील प्रक्रिया आमचे प्रतिनिधी करून घेतील. *कोविड लसीकरण प्रक्रिया* *काउंटर १: नोंदणी (Registration)* ज्या लाभार्थींनी ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांची या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून दिली जाईल. रोज २०० लाभार्थ्यांना लस दिली जाते. डोस शिल्लक असेल तर पुढील प्रक्रिये साठी काउंटर २ ला पाठवले जाईल, नाही तर आपल्याला पुढील दिवसाची अपॉइंटमेंट दिली जाईल. *काउंटर २: व्हेरिफिकेशन (Verification)* जर आपण ऑनलाईन नोंदणी स्वतः केली असेल तर थेट या काउंटर ला या. येथे आपला फोटो व ओळखपत्राचा फोटो घेऊन आपले व्हेरिफिकेशन केले जाईल. आपले वय ४० ते ६० दरम्यान असेल तर डॉक्टरांचे सर्टिफिकेट येथे जमा करावे लागेल. आपल्याला येथे कोविड लसीकरण संमतीपत्र दिले जाईल, कृपया ते नीट वाचून योग्य पर्यायावर खूण करून स्वाक्षरी करावी. *काउंटर ३: भरणा (Payment)* येथे लसीकरण शुल्क रु २५० प्रतिव्यक्ती प्रति डोस या प्रमाणे भरावे. आपल्याला पावती व OPD पेपर दिला जाईल. लस घेतल्यानंतर २ ते ३ दिवस कणकण, अंगदुखी असा थोडा त्रास होऊ शकतो. त्या साठी ३ दिवसाची औषधे, दुसऱ्या डोस च्या सूचना व लसीकरणा नंतर घ्यायची काळजी याची माहिती या पेपर वर आहे. ती नीट वाचून घ्यावी. *काउंटर ४: लसीकरण (Vaccination)* येथे पूर्ण भरलेले व सही केलेलं कोविड लसीकरण संमतीपत्र जमा करावे. येथे आपल्याला कोविड ची लस दिली जाईल. आपण येथे फोटो घेऊ शकता. *काउंटर ५: निरीक्षण कक्ष (Observation Hall)* लसीकरणानंतर आपल्याला येथे ३० मिनिट थांबावे लागेल. काही त्रास वाटल्या त्वरित सांगावे, उपचार केले जातील. *काउंटर ६: प्रमाणपत्र (Certification)* काही त्रास न झाल्यास ३० मिनिटांनंतर येथे कोविड लसीकरण प्रमाणपत्र (प्रथम डोस घेतल्याचे) दिले जाईल. *छायाचित्र काढणे (PHOTOGRAPHY)* प्रमाणपत्र घेतल्या नंतर बाहेर आल्यावर उजव्या बाजूला (मेडिकल समोर) फोटो काढण्या साठी कटाऊट ठेवला आहे. तेथे प्रमाणपत्रासहित फोटो काढावा. हा फोटो सोशल मीडिया वर शेअर करावा व जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अधिक माहिती साठी संपर्क. 7028062780 9370108108