
2021-03-26T04:10:26
https://youtu.be/h3aNyExtAGs *करोना लस घेण्यासाठी* www.cowin.gov.in या पोर्टल वर नोंदणी व पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) कशी निश्चित करायची या साठी वरील विडिओ पहा. नोंदणी (रेजिस्ट्रेशन) झाल्या नंतर अपॉइंटमेंट घेताना *शिवम मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल*, फुरसुंगी, पुणे येथे लस घेण्यासाठी, *Pin Code 412308* एंटर करावा. या नंतर खाली लसीकरण केंद्रांची यादी येईल. या मध्ये *SHIVAM MULTYSPECIALITY HOSPITAL*, Taravdi, Fursungi, Pune हे केंद्र सिलेक्ट करावे. *आपल्याला लस उपलब्धते नुसार तारखा दिसतील.* या मध्ये प्रत्येक तारखेला दोन सत्रात लस घेता येईल. *Forenoon: स १० ते १* *Afternoon: दु २ ते ५* आपल्याला हवी असलेल्या तारखे समोरील योग्य वेळेच्या पर्यायावर क्लिक करा. खाली स्क्रोल करून Book वरती क्लीक करा. आपल्याला मोबाईल वर NHPSMS वरून अपॉइंटमेंट चा SMS येईल तो आपण हॉस्पिटल ला आल्यावर दाखवावा. या नंतर पूर्वनियोजित वेळ सुनिश्चित करण्यासाठी www.shivamhospitalpune.in या संकेतस्थळा भेट द्या. Book Appointment वर क्लिक करा. COVID VACCINATION सर्विस निवडा, COVID Vaccinator 1 किंवा 2 निवडा. बाकीची माहिती भरून आपल्याला हवी असलेली तारीख व वेळ निवडा व अपॉइंटमेंट बुक करा. कृपया सुनिश्चित केलेल्या तारीख व वेळेलाच हॉस्पिटल ला लसीकरणासाठी या. यामुळे गर्दी होणार नाही व आपल्याला थांबावे लागणार नाही. दिलेल्या तारीख आणि वेळे मध्ये शिवम हॉस्पिटल, काळभोर लॉन्स समोर, पुणे सोलापूर रोड, तरवडी, फुरसुंगी, पुणे 412308 येथे आपला मोबाइल व ओळखपत्र (जे रेजिस्ट्रेशन ला वापरले ते) घेऊन या. *कोविड लसीकरण प्रक्रिया* *काउंटर 1: केस पेपर (OPD Case Paper)* येथे आपली माहिती घेऊन केस पेपर दिला जाईल. लस घेतल्यानंतर २ ते ३ दिवस कणकण, अंगदुखी असा थोडा त्रास होऊ शकतो. त्या साठी ३ दिवसाची औषधे, दुसऱ्या डोस च्या सूचना व लसीकरणा नंतर घ्यायची काळजी याची माहिती या पेपर वर आहे. ती नीट वाचून घ्यावी. *काउंटर 2A: नोंदणी (Registration)* ज्या लाभार्थींनी ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांची या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून दिली जाईल. *काउंटर 2B: व्हेरिफिकेशन (Verification)* येथे आपला फोटो व ओळखपत्राचा फोटो घेऊन आपले व्हेरिफिकेशन केले जाईल. *काउंटर ३: भरणा (Payment)* येथे लसीकरण शुल्क रु २५० प्रतिव्यक्ती प्रति डोस या प्रमाणे भरावे. आपल्याला पावती दिली जाईल. *काउंटर ४: लसीकरण (Vaccination)* येथे आपल्याला कोविड ची लस दिली जाईल. आपण येथे फोटो घेऊ शकता. *काउंटर ५: निरीक्षण कक्ष (Observation Hall)* लसीकरणानंतर आपल्याला येथे ३० मिनिट थांबावे लागेल. काही त्रास वाटल्या त्वरित सांगावे, उपचार केले जातील. *काउंटर ६: प्रमाणपत्र (Certification)* काही त्रास न झाल्यास ३० मिनिटांनंतर येथे कोविड लसीकरण प्रमाणपत्र दिले जाईल. *छायाचित्र काढणे (PHOTOGRAPHY)* प्रमाणपत्र घेतल्या नंतर बाहेर आल्यावर, मेडिकल समोर फोटो काढण्या साठी कटाऊट ठेवला आहे. तेथे प्रमाणपत्रासहित फोटो काढावा. हा फोटो सोशल मीडिया वर शेअर करावा व जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अधिक माहिती साठी संपर्क. 9370108108